रोजाना फ्री टिप्स के लिए हमसे WhatsApp Group पर जुड़ें Join Now

रोजाना फ्री टिप्स के लिए हमसे Telegram Group पर जुड़ें Join Now

कालभैरव वरद स्तोत्र || Kalbhairav Varad Stotra || Kalabhairava Varad Stotra

कालभैरव वरद स्तोत्र, Kalbhairav Varad Stotra, Kalbhairav Varad Stotra Ke Fayde, Kalbhairav Varad Stotra Ke Labh, Kalbhairav Varad Stotra Benefits, Kalbhairav Varad Stotra Pdf, Kalbhairav Varad Stotra Mp3 Download, Kalbhairav Varad Stotra Lyrics. 

10 वर्ष के उपाय के साथ अपनी लाल किताब की जन्मपत्री ( Lal Kitab Horoscope  ) बनवाए केवल 500/- ( Only India Charges  ) में ! Mobile & Whats app Number : +91-9667189678

नोट : यदि आप अपने जीवन में किसी कारण से परेशान चल रहे हो तो ज्योतिषी सलाह लेने के लिए अभी ज्योतिष आचार्य पंडित ललित त्रिवेदी पर कॉल करके अपनी समस्या का निवारण कीजिये ! +91- 9667189678 ( Paid Services )

30 साल के फ़लादेश के साथ वैदिक जन्मकुंडली बनवाये केवल 500/- ( Only India Charges  ) में ! Mobile & Whats app Number : +91-9667189678

श्री कालभैरव वरद स्तोत्र || Shri Kalbhairav Varad Stotra || Kalabhairava Varad Stotra

आज हम आपको भैरव नाथ जी के ऐसे स्तोत्र के बारे में बताने जा रहे हैं जिसका पाठ करने से व्यक्ति को रोगों से मुक्ति, भूत प्रेत बाधा से मुक्ति, तांत्रिक बाधा से मुक्ति आदि परेशानी से बड़ी आसानी से छुटकारा पा सकता हैं ! इसके साथ साथ Shri Kalbhairav Varad Stotra का जाप करने से व्यक्ति को राहू, केतु व् शनि जैसे ग्रह से होने वाले कष्टों से मुक्ति मिलती हैं ! शनिवार या मंगलवार कभी भी अपने घर में Shri Kalbhairav Varad Stotra पाठ का वाचन कराने से समस्त कष्टों और परेशानियों से मुक्त हो सकते हैं । !! जय श्री सीताराम !! जय श्री हनुमान !! जय श्री दुर्गा माँ !! यदि आप अपनी कुंडली दिखा कर परामर्श लेना चाहते हो तो या किसी समस्या से निजात पाना चाहते हो तो कॉल करके या नीचे दिए लाइव चैट ( Live Chat ) से चैट करे साथ ही साथ यदि आप जन्मकुंडली, वर्षफल, या लाल किताब कुंडली भी बनवाने हेतु भी सम्पर्क करें : 9667189678 Shri Kalbhairav Varad Stotra By Online Specialist Astrologer Acharya Pandit Lalit Trivedi. 

श्री कालभैरव वरद स्तोत्र || Shri Kalbhairav Varad Stotra || Kalabhairava Varad Stotra

ॐ नमो श्री गजवदना । गणराया गौरीवंदना ।।  

विघ्नेशा भवभय हरणा । नमन माझे साष्टांगी ।।1।।

नंतर नमिली श्री सरस्वती । जगन्माता भगवती ।।

ब्रम्हकुमारी विणावती । वियादात्री विश्वाची ।।2।।

नमन तसे गुरुवर्या । सुखनिधान सद्गुरुराया ।।

स्मरुनी त्या पवित्र पाया । चित्तशुद्धि जाहली ।।3।।

थोर ऋषिमुनी संतजन । बुधगण आणि सज्जन ।।

करुनी तयांसी नमन । ग्रंथरचना आरंभली ।।4।।

पूर्वकाळी एकदा अगस्त्य ऋषी । भेटले कार्तिकेयस्वामींसी ।।

नमस्कार करुनी तयांसी । प्रश्न विचारु लागले ।।5।।

तेहतीस कोटी देव असती । प्रत्येक आपणच श्रेष्ठ म्हणती ।।

सामान्य माणसाची मती । गुंग होऊनी जातसे ।।6।।

गाणपत्य म्हणती गणपती । शाक्त म्हणती महाशक्ति ।।

स्मार्त म्हणती पशुपती । वैष्णव म्हणती श्रीविष्णु ।।7।।

नाना देव नाना देवता । प्रत्येकाची ज्येष्ठश्रेष्ठता ।।

आपापल्या परीने भक्ता । आकर्षुनी घेतसे ।।8।।

हा श्रेष्ठ की तो श्रेष्ठ । कोण कोणाहुनी कनिष्ठ ।।

हे न कळल्याने स्पष्ट । मन संभ्रमी पडतसे ।।9।।

कोणी म्हणती कालभैरव । हाच खरा महादेव ।।

तयाचे कृपेने सदैव । सकल कल्याण होतसे ।।10।।

कालभैरव हा देव कुठला । कसा त्याचा उद्भव झाला ।।

हें जाणण्याची मला । आतुरता फार लागली ।।11।।

तरी आता कृपा करुनी । कोणता देव श्रेष्ठ सर्वांहुनी ।।

ते मज सांगावे समजावुनी । उपकार मोठे होतील ।।12।।

तेव्हां स्कंदानीं अगस्तीसी । जी कथा सांगितली अपूर्वसी ।।

ती सांगतों सर्वासीं । म्हणे मिलिंदमाधव  ।।13।।

सुमेरू पर्वतावरी एकेकाळीं । ब्रह्मादि सकळ देवमंडळी ।

चर्चा करीत होती बसली । तेव्हां काय जाहलें  ।।14।।

ऋषी आणि मुनीजन । सर्वानी एकत्र जमून ।

सुमेरूवरी केलें आगमन । घेतलें दर्शन देवांचें  ।।15।।

ब्रह्मदेवासी हात जोडून । त्यानी केला एक प्रश्न ।

” देवांमाजी सर्वश्रेष्ठ कोण । प्रभो आम्हां सांगावे “।।16।।

तेव्हां त्या ब्रह्मदेवाने । स्वसामर्थ्याच्या अहंकाराने ।  

आणिक अतिशय अविचाराने । उत्तर दिलें झडकरी ।।17।।

मी संपूर्ण सृष्टीचा निर्माता । स्वयंभू अनादि ब्रह्म असतां ।

माझी असामान्य श्रेष्ठता । स्वयंसिध्दच आहे कीं ।।18।।

ब्रह्मदेवाची गर्वोक्ति ऐकून । क्रोधायमान झाले ऋतुनारायण ।

म्हणाले,” हें आहे तुझें अज्ञान । सत्य तूं न जाणसी ।।19।।

मी विश्वाचा पालनकर्ता । मीच सृष्टीचा नियंता ।

मीच गतिशक्तीचा कर्ता । प्रत्यक्ष यज्ञस्वरूप मी ।।20।।

मी आहे परमज्योती । मीच आहे परागती ।

केलिस सृष्टिची उत्पत्ति । माझ्याच प्रेरणेने तूं ।।21।।

अर्थात तूं श्रेष्ठ नसून । मीच आहे श्रेष्ठ जाण ।

स्वतःकडे घेसी मोठेपण । काय तुला म्हणावें “।।22।।

झालें, ऐसें जुंपलें भांडण । ” मीच श्रेष्ठें ” म्हणती दोघेजण ।

शेवटीं ” वेदांसी विचारूं आपण “। असें त्यांनीं ठरविलें ।।23।।

ऋग्वेद आणि यजुर्वेद । सामवेद आणि अथर्ववेद ।

यांच्याशीं केला वादविवाद । ” श्रेष्ठ देव कोण असे ? “।।24।।

ऋग्वेद म्हणे ” ज्याचे पासून । सर्वांचें होते प्रवर्तन ।

ज्यांत भूतमात्रांचा विलय जाण । तोच रुद्र श्रेष्ठ असे “।।25।।

यजुर्वेद म्हणे विचार करून । योगद्वारें होतें ज्याचें अर्चन ।  

यज्ञयागांचा स्वामी स्वयंप्रमाण । शिव तो श्रेष्ठ जाणावा ।।26।।

साम म्हणे ” ज्यामध्यें विश्वाचें भ्रमण । योगीजन करिती जयाचें ध्यान ।

ज्याच्या तेजें ब्रह्मांड उजळे पूर्ण । एक त्र्यंबक श्रेष्ठ तो ” ।।27।।

अथर्व देई तसेच उत्तर। म्हणे ” जो भक्तांचे दु:ख करी दूर।।

तोच कैवल्यरूप श्रीशंकर। श्रेष्ठ असे सवांर्हुनी ” ।।28।।

वेदांचे उत्तर ऐकून । ब्रह्मा आणि नारायण ।।

दोघांनीही संतापून । निंदा केली शिवाची ।।29।।

तोंच अमूर्त प्रणव सनातन । मूर्त स्वरूप करूनी धारण ।।

म्हणे स्वयंज्योती शंकर भगवान । सर्व देवांत श्रेष्ठ असें ।।30।।

तरीही दोघांचे भांडण । संपले नाही मुळीच जाण ।।  

दूर होईना त्यांचे अज्ञान । तेव्हा चमत्कार जाहला ।।31।।

दोघांच्या मध्ये एक विराट । दिव्य प्रकाशज्योत झाली प्रगट।।

त्या ज्योतीचा लखलखाट । विश्वव्यापी भासला ।।32।।

हां हां म्हणता ज्योतिर्मंडली । एक बालकाकृती दिसु लागली ।।

दिव्य तेजप्रभा आगळी । मुखावरी विलसतसे ।।33।।

वर्ण शुद्धनिलांजनासमान । त्रिनेत्र विचित्र नागभूषण ।।  

त्रिशूळ वाजवी खणखण । शिवाचा अंशावतार तो ।।34।।

ज्याला बघुनी प्रत्यक्ष काळ । भयभीत होई कांपे चळचळ ।।  

कालभैरव नावे सकळ । संबोधती तयाला ।।35।।

दुष्टांचे करी तो दमन ।  यास्तव ’ आमर्दक ’ नामाभिधान ।।

भक्तांचे पाप करी भक्षण ।। म्हणूनी पापभक्षक तो ।।36।।

’ कालराज ’ हेही नाव त्याचे । रक्षण करी तो काशी क्षेत्राचें ।।

पारिपत्य करुनी पाप्यांचें । शासन घोर करीतसे ।।37।।

अंगी विश्वोद्धारक शक्ति । त्रिलोकी जयाची थोर कीर्ती ।।  

ऐसी पाहूनी बालमूर्ति । ब्रह्मदेव त्यासी बोलला ।।38।।

माझ्या पांचव्या मुखापासुनी । जन्म तुझा झाला म्हणोनी ।।

मला आता शरण येउनी । शुभाशिर्वाद घेई तू ।।39।।

भणाणले ब्रम्हदेवाचे मस्तक । शिवनिंदा करी पाचवे मुख ।।  

ऐकुनी त्याची बकबक ।। काळभैरव क्रुद्ध जाहला।।40।।

भव्य रूप प्रगट केले । अक्राळ विक्राळ आगळे ।।

डोळे लालेलाल झाले । जळत्या निखार्‍यासारखे।।41।।

मग त्या काळभैरवानें । डाव्या करंगळीच्या नखाने ।।

ब्रह्मदेवाचे शिर छाटिले रागाने । अपराध केला म्हणोनी ।।42।।

तेव्हा त्या ब्रह्मदेवाचे डोळे । एका क्षणात चक्क उघडले ।।  

आणि त्यांनी हात जोडीले । चुकलो चुकलो म्हणोनी ।।43।।

नारायणेंही तेंच केले । भैरवस्तुती स्तोत्र गाईले ।।  

दोघांनाही सत्य ज्ञान झालें । प्रत्यक्ष शिव प्रगटले ।।44।।

देवांनी केली पुष्पवृष्टी । आनंदे भरली सर्व सृष्टि ।।

श्रीशंकराची दयादृष्टि । अभय देई दोघांना ।।45।।

शिव म्हणे ब्रह्मदेवाला । आणि यज्ञस्वरूपी नारायणाला ।।

मीच हा अवतार घेतला । अज्ञान दूर करायासी ।।46।।

अष्टभैरव माझे अंशावतार । काळभैरव हा सर्वाहुनी थोर ।।

त्याची तीन स्वरूपे अगोचर । जाणते तेच जाणती ।।47।।

महाकाळ,बटुकभैरव । तिसरा स्वर्णाकर्षणभैरव ।  

तयावरी ठेविती भक्तीभाव । त्यांचे कल्याण होतसे ।।48।।

क्षेत्रपाल,ईशानचंडेश्वर । मृत्युंजय,मंजुघोष,अर्धनारीश्वर।

नीलकंठ,दंडपाणी,दक्षिणामूर्तिवीर । अवतार माझेच असती ते।।49।।

काळभैरवाची करतील भक्ती । त्यांची होईल कामनापूर्ती ।।  

विघ्नेदु:खें दूर होती । सत्य सत्य वाचा ही ।।50।।

मग म्हणे काळभैरवासी । तूं जरी माझा अवतार अससी ।।

तरीही स्पष्ट सांगतो तुजसी । सत्य ते सत्य मानावे ।।51।।

ब्रह्मदेवाचे पाचवे मुख । माझी निंदा करी नाहक ।।

म्हणुनी फक्त तेंच मस्तक । कापिंलेस तूं कोपाने ।।52।।

क्रोधाग्नि पेटता मनी । विवेकबुद्धि भस्म होउनी ।।  

घडती पापें हातुनी । अविचारी अनर्थ होतसे ।। 53।।

तू वागलास अविचाराने ।  तुझ्या त्या दुष्कृत्याने ।  

ब्रह्महत्येच्या महापातकाने ।  ग्रासिले असे तुजलागी ।।54।।

ब्रम्हहत्येचे पाप अघोर । दुष्परिणाम त्याचे थोर ।।

कोणी कितीही असो बलवत्तर । पापमुक्त न होई ।।55।।

जो कोणी महापातक करी । तो तो जातो नरकपुरी ।।

अनंत युगे  दु:ख भारी । भोगणे प्राप्त होतसे ।। 56।।

जेव्हा महापातकी प्राणी । मुक्त होतो नरककुंडातुनी ।।

त्याला वृक्षवेली शिळा योनी । सप्त लक्ष वर्षे लाभते ।।57।।

त्यानंतर कीड, मुंगी जीव योनी । सात हजार वर्षे कष्ट भोगुनी ।

पशुपक्षादि अनेक जन्म घेऊनी । दु:ख भोगी अपार ।।58।।

हे शिवाचे भाषण ऐकुनी । काळभैरव घाबरला मनीं ।।  

म्हणे मुक्त व्हावया पापातुनी । काही उपाय सांगावा ।। 59।।

शिव म्हणे मग त्यासी । एक उपाय सांगतो तुजसी ।।

पृथ्वीवरील ती वाराणसी । अविमुक्त तें क्षेत्र असे ।।60।।

त्या क्षेत्राचे रक्षण । चण्डिका करिती रात्रंदिन ।।

त्या सर्वांचे नामाभिधान । ऐक आता सांगतो ।।61।।

दुर्गा उभी दक्षिणेला । अंतरेश्वरी नैऋत्येला ।।

अंगारेश्वरी पश्चिमेला । सुसज्ज असे सर्वदा ।। 62।।

भद्रकाली असे वायव्येला । भीमचंडी उभी उत्तरेला ।।

महामत्ता ईशान्यदिशेला । क्षेत्ररक्षण करितसे ।।63।।

उर्ध्वकेशी सहित शंकरी ।। पूर्व दिशेचे रक्षण करी ।।  

अध:केशी आग्नेय कोनावरी ।। लक्ष ठेवी अखंडित ।।64।।

ऐसे ते काशीक्षेत्र जाण । भूलोकी असे पवित्र पावन ।।

तेथील पंचगंगेत करिता स्नान । पापक्षालन होतसे ।।65।।

देवदेवता, यक्ष किन्नर । नाग, सिद्ध आणि विद्याधर ।।

पिशाच्चें आणि नारीनर । होती पापमुक्त तिथें ।।66।।

त्या क्षेत्री तु जाशील जेव्हा । पापमुक्त तुही होशील तेव्हा ।।

वंद्य होऊनी सर्व देवा । सुखें तेथे राहशील ।।67।।

घ्यावयासि आतां प्रायश्चित्त । कापलेले मस्तक घे हातांत ।।  

काशीला जा भिक्षा मागत । पापमुक्त व्हाया ।।68।।

ऐसे बोलुनी क्षणात । कैलासपती झाले गुप्त ।।  

काळभैरव तिन्ही लोकात । भ्रमण करु लागला ।।69।।

तो पुढे पुढे चाले जरी । महापातक त्याचा पाठलाग करी ।।

येता वाराणशीच्या वेशीवरी । पाप तेथेच थांबले ।। 70।।

काळभैरव प्रवेशिता काशीक्षेत्री । हातांतील शीर पडले खालती ।।

त्या स्थळा ” कपालमोचन ” म्हणती । तीर्थ प्रसिद्ध झाले तें ।।71।।

काळभैरव झाला तेथील । शहराचा मुख्य कोतवाल ।।

दैवत थोर काशीतील । सर्वाहुनी ठरला श्रेष्ठ तो ।।72।।

आधीं दर्शन काळभैरवाचे । नंतर श्रीकाशीविश्वेश्वराचे ।।  

ऐशापरी वागती तयांचे । सकल पाप जातसे ।।73।।

कार्तिक मास तो पवित्र । वद्य अष्टमी पवित्र फार ।।  

काळभैरवाचा अवतार । शुभदिनी त्या जाहला ।।74।।

कोणतीही अष्टमी , चतुर्दशी । रविवार किंवा मंगळवार दिवशी ।।  

शरण जावे काळभैरवासी । करावी पूजाप्रार्थना ।।75।।

तोतो होतो प्रसन्न ज्याला । दु:ख चिंता नसते त्याला ।।  

अशुभ अमंगल जाते लयाला । सकल सिद्धी लाभती ।।76।।

होते इच्छित दीर्घायु संतती । मिळते स्थावरजंगम संपत्ती ।।

काळभैरवाचे महात्म्य किती । आणि कैसे वर्णावे ।।77।।

शत्रुभय आणि चोरभय । समूळ निश्चये नष्ट होय ।।

म्हणुनी तयाचेच पाय । धरावे भक्तिभावाने ।।78।।

वैभवशिखरीं भक्त चढे । दिनोदिनी लौकिक वाढे ।।  

त्यासी पाहता काळ दडे । काळभैरवाच्या धाकाने ।।79।।

राजलक्ष्मी आणि राजमान्यता । मिळे समाजांत मानमान्यता ।।

काळभैरवाच्या सत्य भक्ता । उणे न पडे काहींही ।।80।।

स्कंदस्वामींचे भाषण ऐकुनी । समाधान पावले अगस्तीमुनी ।।

काळभैरवस्मरण करीत मनी । स्वस्थानी गेले आनंदे ।।81।।

यास्तव जोडुनी दोन्ही हस्त । म्हणावे काळभैरव वरद स्तोत्र ।।  

जपावा काळभैरव मंत्र । निशिदिनी मनीं अखंड 82।।

ऐसे करील जो सहामास । काळभैरव प्रसन्न होईल त्यास ।।  

देव भक्तांचा होतो दास । स्वंयसिद्ध सत्य हे ।।83।।

कोणी रंक असो वा राव । हृदयी धरुनी दृढभाव ।।  

प्रार्थना करिता काळभैरव । धाउनी येई संकटी ।।84।।

सदा ठेवुनी सद्वर्तन । करिती जे काळभैरव स्मरण ।।  

तयांसी साक्षात शंकर भगवान । प्रत्यक्ष दर्शन देतसे ।। 85।।

भैरवाचे कराया पूजन चिंतन । काळवेळेचे नसे बंधन ।।

स्त्रीपुरुषांनी त्यासी निशिदिन । भक्तिभावे भजावे ।।86।।

घरींदारी, कचेरीत, । वाटेत किंवा प्रवासात ।  

नामस्मरण करावे अखंडित । तेणे कल्याण होतसे ।।87।।

काळभैरव होता प्रसन्न । पळते पाप आणि दैन्य ।।

मिळते विपुलधनधान्य । ऐसे सामर्थ्य तयांचे ।।88।।

अघोरीविद्या, मंत्रतंत्रशक्ती । भैरवभक्तांसी कधी न बाधती ।।

स्तोत्र हे जेथे पठण करिती । तेथें भुतेखेते न राहती ।।89।।

काळभैरवासी नित्य स्मरता । बंदिवासातुन होते मुक्तता ।।  

येते हाती राजसत्ता । ऐसा समर्थ देव तो ।।90।।

ॐ असितांगभैरवाय नम:। ॐ रुरुभैरवाय नम:।।

ॐ चंडभैरवाय नम:। ॐ क्रोधभैरवाय नम:।।91।।

ॐ उन्मत्तभैरवाय नम:।ॐ कपालीभैरवाय नम:।।  

ॐ भीषणभैरवाय नम:। ॐ संहारभैरवाय नमो नम:।।92।।

ॐ महाकाळा, महाकोशा। महाकाया, विश्वप्रकाशा ।।

मत्ता, महेशा, सर्वेशा । काळभैरवाय नमो नम: ।।93।।

संहाररूपा, खट्वांगधारका । कंकाळा, पापपुण्यशोधका ।।

सुराराध्या, तापहारका । काळभैरवाय नमो नम: ।।94।।

लोलाक्षा, लोकवर्धना । लोस्याप्रिया, श्वानवाहना ।।  

भुतनाथा, भुतभावना । काळभैरवाय नमो नम: ।।95।।

हे श्री देवाधिदेवा । कराल वदना, काळभैरवा ।।  

कृपाशिर्वाद नित्य असावा । पदीं लीन जाहला ।।96।।

कुटुंबातील सर्व व्यक्ती । त्यांसी दीर्घायुष्य, आरोग्य, शक्ति ।।  

बुध्दि, किर्ती, संपत्ती । देऊनी वंश वाढवी ।।97।।

जाऊं आम्ही जेथें जेथें । कार्यसिध्दी होवो तेथें ।।

मनी कुविचार भलभलते । येऊं नको देऊं तूं ।।98।।

मिलिंदमाधव याच साठी ।  तुझ्या पायी घाली मिठी ।।

अपराध पापें कोटीकोटी । क्षमा त्यांची करावी ।।99।।

घरीं नांदो सतत शांतता । पडूं नये कशाची कमतरता ।।  

योगक्षेमाची नसावी चिंता । हेंच देंवा मागणे ।। 100।।

शके अठराशे सत्याण्णवासी । माघमासी कृष्णपक्षीं ।।

चतुर्दशी  महाशिवरात्रीसी । ग्रंथ पूर्ण झाला हा ।।101।।

श्री काळभैरवार्पणमस्तु ।। शुभं भवतु ।। काळभैरव वरद स्तोत्र ग्रंथ संपूर्ण ।।

10 वर्ष के उपाय के साथ अपनी लाल किताब की जन्मपत्री ( Lal Kitab Horoscope  ) बनवाए केवल 500/- ( Only India Charges  ) में ! Mobile & Whats app Number : +91-9667189678

<<< पिछला पेज पढ़ें                                                                                                                      अगला पेज पढ़ें >>>


यदि आप अपने जीवन में किसी कारण से परेशान चल रहे हो तो ज्योतिषी सलाह लेने के लिए अभी ज्योतिष आचार्य पंडित ललित त्रिवेदी पर कॉल करके अपनी समस्या का निवारण कीजिये ! +91- 9667189678 ( Paid Services )

यह पोस्ट आपको कैसी लगी Star Rating दे कर हमें जरुर बताये साथ में कमेंट करके अपनी राय जरुर लिखें धन्यवाद : Click Here

रोजाना फ्री टिप्स के लिए हमसे WhatsApp Group पर जुड़ें Join Now

रोजाना फ्री टिप्स के लिए हमसे Telegram Group पर जुड़ें Join Now